Posts

Showing posts from August, 2020
Image
 नकार        साधे -सोपे ,सरळ आणि सुंदर अशा व्याख्येत मोडायचे तिचे आयुष्य! नटणे- मुरडणे, सजने- सवरणे अशा गोष्टींपासून चार हात लांब असायची ती! तो हिंदी सिनेमा आहे ना ' कुछ कुछ होता है ' त्यातील अंजली सारखी.      पाहुणे मंडळी पाहायला येणार असे म्हटल्यावर तिला घरच्या स्त्रियांनी तिने कधीच न घातलेल्या अलंकारांनी नटवले. त्यावेळी ती खूप सुंदर दिसत होती. नव्या नवरीसारखी तिच्या गाली लाली आली होती, चेहऱ्यावर एक वेगळीच चमक आली होती आणि त्यात भर जरतरी साडीची. साडी नेसल्यावर ती नेहमीपेक्षा उठून दिसत होती. तिने स्वतःला आरशात पाहिले. आपण असेही सुंदर आहोत , मात्र आज थोडे वेगळे दिसतोय याची जाणीव तिला झाली. पाहुणे मंडळी येणार होती ; त्यांच्या स्वागतासाठी सर्व मंडळी सुसज्ज झाली." लेक हे परके धन शेवटी! " कांदे - पोहे देण्याचा कार्यक्रम झाला. पारंपारिक विवाह ठरवताना जे काही होतं अगदी तसच झालं. यात बदल इतकाच की मुला - मुलीला थोडा एकांत देण्यात आला. त्यात सुद्धा लहानग्यांची लुडबुड होतीच. कथेतील नायिका अर्थात दृष्टी आणि नायक सिद्धार्थ यांची एकमेकांसोबत ओळख झाली...

**प्रेमाचे अंतरंग.... Love yourself💞*

**प्रेमाचे अंतरंग.... Love yourself💞*       मी कसा दिसतो/ दिसते....? आरशात पाहून एखादी नक्कल करणे ,चित्रपटातील अभिनेता/अभिनेत्री प्रमाणे बोलणे , त्यांची शैली आपल्या जीवनात अवगत करून त्याप्रमाणे वागणे म्हणजे स्वतःवर प्रेम करणे आले का? बाह्यरूपावरून स्वतःला ओळखणे म्हणजे प्रेम आहे का? कधी स्वतःला हा प्रश्न विचारला आहे का?    "स्व:" ची जाणीव होणे अर्थात सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने वाटचाल करणे होय. यामध्ये शारीरिक , मानसिक इत्यादी बाबी येतात. जे व्यक्ती स्वतःला पूर्णतः समजून घेतात ते सहजरीत्या इतरांनाही समजून घेऊ शकतात.             ज्या व्यक्ती स्वतःवर प्रेम करतात त्या सहजपणे इतरांवर करू शकतात. याचा अर्थ प्रेम या संकल्पनेत आपल्या आसपास आढळणारे व्यक्ती असोत किंवा काही गोष्टी असोत आपण त्यांच्यावर सहजरीत्या निरागसपणे प्रेम करत असतो. 'प्रेम' या भावनेचा थेटपणे संबंध हा बाह्य रूपाशी नसून मनाच्या अंतरंगाशी असतो. आपण स्वतःला सर्वाधिक जाणत असतो. आपले गुणदोष आपल्याला व्यवस्थितपणे माहिती असतात. स्वतःवर प्रेम करण्यासाठी फार काही करावे ल...