प्रयत्नांती परमेश्वर !
यु तो साँस भी आज जहरीली है फिर भी जीने की चाहत- सी है यु तो जिंदगी इम्तहान ले रही है फिर भी दिल में राहत- सी है! नेहमीप्रमाणे 'Whatsapp'उघडलं आणि कंटाळा जावा म्हणून मेसेज बघत बसले व्हॉट्सऍप आजकाल जीव की प्राण झालाय जणू !असाच एक मेसेज वाचला आणि अस्वस्थ झाले. त्या मेसेज मागे सुरुवातीला विशेष असं काहीच वाटलं नाही कारण लॉकडाऊनमुळे कोरोनासंदर्भात बातम्या कोणत्या ना कोणत्या तरी ग्रुपमध्ये पडत असतात. बऱ्याच लोकांच्या स्टेटसला ते मेसेज वाचून दुर्लक्ष करावे वाटते.दिवसभर कोणाचे ना कोणाचे मेसेज चालूच असतात. आजकाल कोरोनाच्या बातम्या जरी कानावर पडल्या तरी ते ऐकायला नको वाटते. बऱ्याच नकारात्मक ,चेष्टा-मस्करीच्या बातम्या आपण सर्वजण ऐकतो .एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून देतो. तो message इंजेक्शनच्या मागणीचा होता. 'Torcilizumab' हे इंजेक्शनचे नाव !वर्गमैत्रिणीने मेसेज केला आणि ते इंजेक्शन कुठेच उपलब्ध होत नसल्याचे सांगितले. असे...