* प्रेमाचं परिघ* ❤️ 'प्रेम' या विषयावर कितीही लिहिलं तरी विषय काही संपत नाही. प्रेम हा शब्द उच्चारताच आपल्यासमोर तरुणाई दिसते पण प्रेम ही संकल्पना तेवढ्यापुरती मर्यादित नाही. विचारून पहा स्वतःला प्रेम म्हटलं की तुमच्यासमोर काय येतं? आपल्याला लहानपणी कोणी हा प्रश्न विचारला तर आपलं पहिलं उत्तर आई- बाबा असतं. कालांतराने हे उत्तर बदलत देखील जातं. आपल्या आवडी वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यात वेगवेगळ्या असतात. मग आपण प्रेमाला फक्त काही गोष्टींपुरतं मर्यादित का ठेवावं? तरूणांनीच प्रेम करावं किंवा प्रेमात पडावंच असंही नाही. " आभाळ घे मुठीत आता प्रेमाचे कर बंध खुले!"!" "प्रेम आणि आकर्षण" यातील फरक समजत नसणाऱ्या वयात आपण प्रेमातच पडलेले आहोत ही संभ्रमावस्था कित्येकांच्या मनात असते. प्रेमाचं रोपटं फुलण्याच्या आत कोमेजून जातं हे सुद्धा आपल्याला समजत नाही. खरं प्रेम, खोटं प्रेम काय असतं याचं प्रशिक्षण शिबिर कोणीतरी आयोजित करावं आणि आपण ते सारं समजून घ्यावं असं अचानक घडत नाही. प्रत्येकाचं प्रेम हे वेगळं असतं यावेळी " व्यक्ती तितक्या...