Posts

Showing posts from February, 2025

"कॅफे यु अँड मी...!"

Image
साथी समजून घेशील का? निपचित हृदयाच्या स्पंदनांना...? आयुष्यात प्रत्येकाला एक प्रामाणिक साथ हवी असते. 'व्हॅलेंटाइन डे ' ही जरी आपली संस्कृती नसेल तरीही आपल्याला या दिवशी आपला हक्काचा 'व्हॅलेंटाइन' भेटावा असं वाटतं! अनोळखी पासून ओळखीची सुरुवात होताना सारं कसं सुंदर वाटतं! प्रेमात पडताना सतत तीच व्यक्ती हवीशी वाटते. बोलू वाटतं, रुसू वाटतं, त्याने/ तिने रुसवा- फुगवा दूर करावा असं वाटू लागतं. प्रेम कितपत पुढे जाईल याची खात्री नसते तरी पण प्रेम करावसं वाटतं. प्रत्येक वयाचा एक टप्पा असतो अन् त्या टप्प्यानुसार आपल्याला प्रेमाच्या वेगळ्या संकल्पना पहायला मिळतात. वय वीस ते तीस पर्यंत सगळ्या आयुष्याला कलाटणी मिळून जाते. यात घेतलेले निर्णय आयुष्याला नवी दिशा देऊन जातात तर कधी दिशाहीन करून टाकतात. काहीवेळा जाणीव फक्त त्याच्या सोबतीची असते.आपल्या आवडत्या व्यक्तीला पाहणंच बऱ्याचदा आपल्यासाठी पुष्कळ असतं. कॅफे म्हणताना 'कॉफी' तर फक्त निमित्त असावं कारण भूक वगैरे नसते.थकलेल्या जीवाला पुरेसा विसावा हवा असतो. व्यक्ती हा सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने त्रस्त होत असतो. या धावत्या जग...