Posts

Showing posts from July, 2020

Beyond friendship

Beyond friendship प्रेमापेक्षा खुप सुंदर नातं ते म्हणजे 'मैत्री' च नातं आहे. मैत्रीच नातं असतंच असं समजून घेणार, न बोलता समोरच्या मनातली भावना ओळखणार. आमची मैत्री अशीच आहे. प्रेमापेक्षाही खुप प्रेम देणारी, जीव लावणारी त्यामुळे कदाचित आयुष्यातल्या जोडीदाराची गरज आहे असं कधी भासलंच नाही . हीच निखळ मैत्री रोज नव्याने जगण्याला बळ देते. या नात्यात कोणत्याही प्रकारची बंधन नाहीत. दोघेही स्वतंत्रपणे हवं तसं उडू शकतात .  आता तर इतकी सवय झाली आहे की, निदान दिवसातून दोन शब्द जरी बोललो नाहीत तरी आज काहीतरी हरवून गेलं आहे असं वाटतं मग ते दोन शब्द प्रेमळ बोलणे असो किंवा खूप जास्ती भांडणे. कोणतीही गोष्ट बोलताना संकोच न येता बेधडक भावना एकमेकांसमोर व्यक्त करणे हीच तर खरी या नात्यातलं गूढ आहे. आता हे नातं असं निर्माण झालं आहे की मैत्रीच्या पलीकडे आणि प्रेमाच्या थोडं अलीकडे. -वैष्णवी यादव...!!

काही स्वप्न स्वप्नातच पाहायला भारी वाटतात...।

Image
काही स्वप्न स्वप्नातच पाहायला भारी वाटतात...। काही स्वप्न स्वप्नातच पाहायला भारी वाटतात कारण सत्य माहीत असून ही आपण मनाला फसवण्याचा खेळ खेळतोच की, सत्य माहीत असून ही तो खेळ खेळायला मज्जा येतेच की, कारण सत्य स्वीकारण्यापेक्षा ते एक गोड खोट्या कधी न सत्यात येणाऱ्या एका छोट्याश्या आशेवर जगण्याचा आनंद वाटतो. पण तोच एक गोड मनाचा फसवा खेळ संपूर्ण आयुष्य फसवून जातो. प्रेमात असताना ते काही स्वप्न असतात जे सत्यामध्ये कधीच पूर्ण होऊ शकत नसतात. म्हणून प्रेमाची स्वप्न स्वप्नातच पाहायला भारी वाटतात.  माहीत असत हे दोन हृदय कधीच एक होऊ शकणार नाहीत. पण तेच खोटी गोड स्वप्न स्वप्नातच येतातच की प्रेमात असताना माहिती नसत पुढे आयुष्यात काय घडणार आहे.  पण त्यासाठी कोणकोणासाठी थांबत नसत, नियती  पण बघा किती वाईट असते आपण खड्यात पडतोय हे माहीत असूनही वेळ मात्र कोणासाठी थांबत नसते. पण एक मात्र आहे, वेळ मात्र कोणासाठी थांबत नसली तरी ती सगळ्यांवर येतच असते.  बर झालं प्रेमाची स्वप्न स्वप्नातच पहिली नाहीतरी ते स्वप्न स्वप्नातच पाहायला भारी वाटतात. वैष्णवी यादव , सोलापूर.

प्रेरक....!!

Image
       आपल्या आयुष्यात अशी एखादी तरी प्रेरणा असावी की जिच्यामुळे आपले आयुष्य सार्थक व्हावे. मग ती प्रेरणा पुस्तकांतून अमूर्त स्वरूपात किंवा प्रत्यक्ष व्यक्तींकडून मूर्त स्वरूपात दिसू शकते. प्रेरणा आयुष्याला नवे ध्येय देते. मग त्या दिशेने आपली वाटचाल सुरु होते. क्षणार्धात प्रेरणा मिळताच संपूर्ण आयुष्याला कलाटणी मिळते. कोणत्याही कालखंडाचे उदाहरण घ्यायचे झाले तर त्या -त्या कालखंडात लाभलेले व्यक्तिमत्व, पुस्तके ,उपभोगाची साधने ,गरजा यानुसार प्रेरणेचे स्वरूप ठरते. त्यानुसार आपले राहणीमान सुधारते, जीवनपद्धती सुधारते. आयुष्याला एक नवी दिशा प्राप्त होते.         भरकटत चाललेल्या तरुण पिढीला प्रेरणा मिळणे  अत्यंत गरजेचे आहे .मग ती जवळच्या माणसांकडून, विविध चित्रपटांतून ,आपल्या विविध छंदांतून, आपल्या व्यासंगातून ,आपल्या राहणीमानातून, आपल्या कामकाजाच्या पद्धतीतून आपल्याला ती मिळत असते. संगत ही अत्यंत महत्त्वाची असते. बऱ्याच वेळी वाईट प्रेरणेतून अमानवी कृत्य घडल्याचे चित्र समाजात दिसते. सध्याच्या काळात निराशा, ताणतणाव हे भरपूर आहेत. बारीकसारीक गोष्टी...

long distance relationship

Image
प्रेम हे कधीच अंतर पाहत नाही कारण ते मनातून करायचं असत . त्यामुळे  एकमेकांपासून अंतराने दूर असलेल्या व्यक्तीदेखील मनाने एक होतात. यालाच आपण Long distance relationship असं म्हणतो.  असं नात टिकवण्यासाठी दोघांनाही फार मेहनत घावी लागते . एकमेकांना आनंद मिळेल अस वागावं लागत . प्रेम आहे म्हणून ते नेहमी बोलून का दाखवायचं अस विचार करायला नको खर तर या नात्यात नेहमी बोलून दाखवाव लागत म्हणजे एकमेकांविषयी आपुलकी अजुन वाढेल . सोबत नसलो तरीही दिवस भर आपण काय केलं हे एकमेकांना सांगायला हवं . प्रत्येक वेळी एकमेकांच्या भावनांचा आणि निर्णयाचा आदर करावा .  आपण नात्यात प्रामाणिक असावे .तुम्ही एकमेकांना जाणून घेताना तुमच्याबाबतीतली प्रत्येक गोष्ट तुमच्या जोडीदाराला सांगायला हवी. तुमचा प्रामाणिकपणा तुमच्या नात्यामध्ये बळकटी आणण्यास फार  मदत करत असतो. एकमेकांना पासून दूर आहे म्हणून आपण नात्याला नियमित वेळ देणं गरजेचं असत . कितीही कामात असलं तरीही रोज थोडा वेळ बोलायचं .प्रेमात भविष्याविषयी बोलायला अनेकांना आवडते. प्रेम, लग्न, संसार, मुलं, नातेवाईक आणि आनंद या गोष्टी अनेकांना आवडत असतात. आपल...

प्रेमाचा पदर उलगडताना...!!

              प्रेमाचा पदर उलघडताणा....!! त्याला ती आणि तिला तो आवडण म्हणजे प्रेम का ? तिचा तो आणि त्याची ती आसन म्हणजे प्रेम असते का ? तर चला मित्रांनो प्रेम म्हणजे काय समजून घेऊ. वर म्हणल्याप्रमाने हे प्रेमाचे पदर असू शकतात पण  पूर्ण प्रेमाची व्याख्या होणार नाही. प्रेमाची संकल्पना फार व्यापक आहे त्यातील आज आपण काही भागावर आज आपण बोलूयात तुम्हाला आवडेल अशी अपेक्षा ठेवतो काही त्रुटि असल्यास नक्की सुचवा मी सुधारण्याचा प्रयत्न करेल. मित्रांनो आपल्यावर चित्रपटसृष्टी चा प्रभाव असतो, आपण बरयच वेळेस त्याचे अनुकरण करत असतो. त्याचे पाहून आपण प्रेमात पडत असतो त्यात आपण आपल्या साथीदार अभिनेत्या अभिनेत्री सारखा असावा अशी ईछा ठेवत असतो, व आपण आभासी जगत रमत असतो. “पेहेले नजर मे प्यार” अश्या काही क्लपणा आपण TV  वर वारंवार पाहत असतो. व त्यातून आपण त्यांचे अनुकरण करत असतो. आपण सहज कोणाच्या प्रेमात पडत असतो, पण हे प्रेम असते का आकर्षण ??? बर चला आपण मान्य केल की हे आकर्षण आहे तर पुढे प्रश्न असा आहे की आकर्षण म्हणजे काय ??? तर आकर्षणाची व्याख्या करायच झालं तर ...

काळजातील माणसानंसाठी काळजातील काही शब्द

नमस्कार मित्रांनो!             मी आदिनाथ   मागील काही वर्षापासून मी लिखाण करत आहे, त्यावर तुम्ही भरभरून प्रेम देत आहेत आणि पुढेही द्याल याची खात्री   व अपेक्षा आहे. आपल्याला सांगायला खूप आनंद होतो की , आता मी लिहीत असणारे व लिहिलेलं   सर्व लेख, कथा , कविता तुम्हाला कायम वाचता यावेत म्हणून मी माझ सर्व लिखाण आता पुढे ब्लॉग द्वारे घेऊन येणार आहे. (कारण बाकी सर्व सोशल मीडियावर तुम्ही आहेत तर काही जन नाही आहेत म्हणून सर्वांना वाचता याव म्हणून हे सुरू करीत आहे. तुम्हीला वाटत असेल की या विषयावर मी लिहावं ते विषय मला सुचवा मी नक्की लिहिण्याचा प्रयत्न करेल .तुम्ही मला सूचना, मार्गदर्शन कराल याची खात्री आहे. आता विषयाला विराम देतो ,पुढे आपल्याला कायम बोलतच राहायच आहे नवनवीन विषय घेऊन . तर नक्की एकदा आपल्या ब्लॉगला भेट द्यालच.   सर्व वाचकांचे आभार....!!😇😇

राजगृह

Image
  राजगृह “किताबो मे इतना खजाना छुपा हैं जितना कोई लुटेरा कभी लूट नहीं सकता"   " एक किताब जितना वफादार हैं उतनी कोई दोस्त नहीं हैं"                                                                                                                                         असे म्हणतात “ वाचाल तर वाचाल ” माणूस म्हणून ...