Beyond friendship
Beyond friendship
प्रेमापेक्षा खुप सुंदर नातं ते म्हणजे 'मैत्री' च नातं आहे. मैत्रीच नातं असतंच असं समजून घेणार, न बोलता समोरच्या मनातली भावना ओळखणार.
आमची मैत्री अशीच आहे. प्रेमापेक्षाही खुप प्रेम देणारी, जीव लावणारी त्यामुळे कदाचित आयुष्यातल्या जोडीदाराची गरज आहे असं कधी भासलंच नाही . हीच निखळ मैत्री रोज नव्याने जगण्याला बळ देते. या नात्यात कोणत्याही प्रकारची बंधन नाहीत. दोघेही स्वतंत्रपणे हवं तसं उडू शकतात .
आता तर इतकी सवय झाली आहे की, निदान दिवसातून दोन शब्द जरी बोललो नाहीत तरी आज काहीतरी हरवून गेलं आहे असं वाटतं मग ते दोन शब्द प्रेमळ बोलणे असो किंवा खूप जास्ती भांडणे.
कोणतीही गोष्ट बोलताना संकोच न येता बेधडक भावना एकमेकांसमोर व्यक्त करणे हीच तर खरी या नात्यातलं गूढ आहे. आता हे नातं असं निर्माण झालं आहे की मैत्रीच्या पलीकडे आणि प्रेमाच्या थोडं अलीकडे.
-वैष्णवी यादव...!!
Awesome 💞😘
ReplyDelete