Posts

Showing posts from October, 2021

तू कुठे कलेक्टर होणार आहे....?

Image
     मस्तकात सरकन चुणूक आली. वाटलं प्रतिउत्तर करावं आपल्या प्रहारी भाषेत! " साऱ्याच कळ्यांना हक्क आहे उमलण्याचा !" हे आपसूकच आठवलं. नंतर शांत होऊन विचार केला आणि म्हटलं अशी मानसिकता असणारे भरपूर लोकं आहेत. कोणाचं तोंड बंद करणार?  बरेच दिवस मनातले शब्द उतरवण्याची इच्छा होती. नवदुर्गा निमित्त आज लेखाच्या माध्यमातून बोलावं म्हटलं!      एकीकडे स्त्रिया पुरूषाच्या खांद्याला खांदा मिळवत आहेत. एकीकडे तिला कमी लेखणारे, पुढे न जाऊ देणारे लोक पण कमी नाहीत. स्त्री - पुरूष तुलना या समस्येवर मुळापासून घाव घातला जात नाही. अचानक संपूर्ण समस्या संपेल असंही नाही. शिक्षणक्षेत्रात खूप बदल होत आहेत. आपण मात्र शिकूनही अडाणी असल्यासारखी गत! जर प्रत्येकाने कलेक्टर व्हायचे स्वप्न बाळगले तर इतर क्षेत्रात काम करणार तरी कोण? शासकीय परिक्षा देऊन पैसा कमावता येईल. कोणाला वाटतं आपण मोठे नको व्हायला परंतु सर्वांनी अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगले तर कसे चालेल?         नवदुर्गा म्हणजे देवीची नऊ रूपे. शक्तीची, सामर्थ्याची विविध रूपे! एकीकडे देवीचे ...