राजगृह
राजगृह
“किताबो मे इतना खजाना छुपा हैं
जितना कोई लुटेरा कभी लूट नहीं सकता"
"एक किताब जितना वफादार हैं
उतनी कोई दोस्त नहीं हैं"
असे म्हणतात “वाचाल तर वाचाल” माणूस म्हणून जगायला शिकवण्याचे महान कार्य एखाद्या गुरु प्रमाणे पुस्तक करत असते समाजामध्ये आजही जातीची खूप मोठ्या प्रमाणात विषमता आहे. जाती धर्म यांच्यावरून आजही हल्ले केले जातात.आजही आपल्याला माणसा माणसातील विकृती पहायला मिळत आहे, तर आपण विचार करू शकतो की स्वतंत्र पूर्व काळात विषमता किती असेल,माणसाकडे गुलाम म्हणून पाहिल जात होतं. यातून सर्वाना मुक्त करण्याचे सर्वाना समान पातळीवर आणायचे कार्य मुक्तीदाते म्हणून महामहान डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. भारतीय सर्व लोकांना संविधान देऊन एकतेचा छताखाली आणण्याचे महान कार्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी केले.
जर बाबासाहेब नसते तर आजही आपण गुलामी करत असलो असतो.आपल्याला मुक्त करण्याची लढाई डॉ बाबासाहेब आंबेडकरयांनी फक्त लेखणीच्या जोरावर लढली. व ती लढाई लढण्यासाठी ज्ञान मिळवणे गरजेचे होते व त्यासाठी बाबासाहेबांनी अनेक पुस्तके वाचली लिहिली. ही लढाई प्रस्थापित विरूढ विस्थापिती आशिओ होती. त्यांनी खूप जास्त प्रमाणात वाचन केल. व आज जगात त्यांचा जन्मदिवस (14 एप्रिल )हा ज्ञानदिवस म्हणून साजरा केला जातो. यावरून आपल्या लक्षात येईल की डॉ बाबासाहेब आंबेडकर याच्याकडे खप पुस्तके होती. व त्यांची ज्ञान घेण्याची तीव्र तळमळ दिसून येते.
त्यांना जगातील वेगवेगळ्या विषयांवर पुस्तके वाचली होते.त्यांच्याकडे अंदाजे 50 ( पन्नास हजार) पुस्तके होती, त्यामध्ये राजकारण, अर्थशास्त्र, कायद्यावर, तत्वज्ञानावर, युद्धशास्त्र, धर्मशास्त्र, अश्या विविध विषयनावर आहेत ॰ जर आपण विचार केला एक ग्रंथ 100 रुपयाला समजले तर 50,00,000 (पन्नास लाखाचे) ग्रंथ होते व त्यांना जाणवत होत की आता राहत्या घरी पुस्तके ठेवण्यासाठी जागा न्हवती म्हणून त्यांनी ठरवलं की आता आपण ‘नवीन पुस्तकासाठी घर बांधायच असा क्रांतिकारक विचार केला’
राजग्रह बांधण्यासाठी बाबासाहेबांनी दादरच्या हिंदू कॉलनीत दोन फ्लॅट खरेदी केले बांधकामासाठी बँक ऑफ इंडियाकडून कर्ज घेतले होते. सन 1931 ते 1933 या दोन वर्षाच्या कालावधीत बांधले होते. त्यापैकी एकट्या नेनोमे 1941 रोजी विकला व त्यातून त्यांनी कर्ज फेडले व नवीन काही ग्रंथ खरेदी केले फ्लॅट क्रमांक 129 वरील 55 चौरस यार्ड मध्ये राजगृह बांधले, व तेथे कुटुंबासोबत वास्तव करत होते या इमारतीची रचनाकार स्वतः बाबासाहेब होते . त्यात पहिल्या मजल्यावर पुस्तके व त्यांचे काही वस्तू होत्या वरील दोन मजल्यावर आंबेडकरी कुटुंब राहत होते
आज राजग्रह ही एक पवित्र वास्तू व जगातील पुस्तकावर प्रेम करणाऱ्या,मानवता मानणाऱ्या, समता जगणारे अशा प्रत्येक व्यक्तीचा अस्मितेचे केंद्र आहे दलित व बौद्ध जनतेचे एक प्रमुख श्रद्धास्थान व प्रेरणास्थान आहे राजग्रह प्रत्येकाला लढण्याचे व जगण्याचे बळ मिळत असते म्हणून राजगृहाची तुलना आपण जगातल्या कोणत्याच गोष्टी बरोबर करू शकत नाही.
अशा या स्वयंपूर्ण राजगृहावर 07 जुलै 2020 रोजी भ्याड हल्ला करण्यात आला. काही माथेफिरूने राजगृहावर दगडफेक केली, मुळातच हा संघर्ष असा जाणवतो की पुस्तक(ज्ञान) विरुद्ध दगड (अज्ञान). आज आपण कोणत्या दिशेने वाटचाल करत आहोत,याचा आता आपण विचार करणे अत्यंत गरजेचे आहे. कधी महापुरुषांचे पुतळे पाडले जातात तर कधी स्मारकाची विटंबना केली जाते तर कधी महापुरुषाबद्दल चुकीचे वक्तव्य केले जातात तर यावर विचार विनिमय होणे अत्यंत आवश्यक आहे.
की काही माथेफिरु विरोध कशाला करतात व्यक्तिला की त्याच्या विचाराला. जर विचारांचा विरोध करत असेल तर अश्या हल्ले करून विचार संपवता येतात का ? खून करून विचार मारता येतात का ?
तर याच स्पष्ट उत्तर असेल नाही. विचार कायम जिवंत असतात,ते इतरांना कायम जीवंत ठेवत असतात.
दुसरी बाजू व्यक्तीचा विरोध असेल तर ते आपल्या बुद्धीची विचारांचे हार आहे हे मान्य करावे. लागेल सर्व महापुरुषांनी आपल्याला स्वातंत्र्य समता बंधुता यांची शिकवण दिली आहे तरीही जर आपण असेच भ्याड हल्ले करणाऱ्याला शासन करत नसू तपासही उशिरा लागत असेल आपण अत्यंत कठीण काळात आहोत, आपली विषमतेकडे वाटचाल सुरू आहे, याचा विचार व्हावा.
जर येथे संविधान लोकशाही निर्माण झालेल्या घरावर हल्ला होत आहे, तर पुढे हा हल्ला संविधानावर होऊ शकतो, व्यक्तिस्वातंत्र्यावर होऊ शकतो, आपण पारतंत्र्यात कडे वाटचाल करत आहोत का याचा एकदा आपण विचार करायला हवा .
Rebel Words
adinath.j11243@gmail.com



मस्त आहे खूप
ReplyDeleteKhup Chan vichar aahet..... Shaky titkya friends na send karen.... ������������
ReplyDelete