प्रेमाचा पदर उलगडताना...!!

              प्रेमाचा पदर उलघडताणा....!!

त्याला ती आणि तिला तो आवडण म्हणजे प्रेम का ? तिचा तो आणि त्याची ती आसन म्हणजे प्रेम असते का ? तर चला मित्रांनो प्रेम म्हणजे काय समजून घेऊ. वर म्हणल्याप्रमाने हे प्रेमाचे पदर असू शकतात पण  पूर्ण प्रेमाची व्याख्या होणार नाही.
प्रेमाची संकल्पना फार व्यापक आहे त्यातील आज आपण काही भागावर आज आपण बोलूयात तुम्हाला आवडेल अशी अपेक्षा ठेवतो काही त्रुटि असल्यास नक्की सुचवा मी सुधारण्याचा प्रयत्न करेल.
मित्रांनो आपल्यावर चित्रपटसृष्टी चा प्रभाव असतो, आपण बरयच वेळेस त्याचे अनुकरण करत असतो. त्याचे पाहून आपण प्रेमात पडत असतो त्यात आपण आपल्या साथीदार अभिनेत्या अभिनेत्री सारखा असावा अशी ईछा ठेवत असतो, व आपण आभासी जगत रमत असतो.
“पेहेले नजर मे प्यार” अश्या काही क्लपणा आपण TV  वर वारंवार पाहत असतो. व त्यातून आपण त्यांचे अनुकरण करत असतो. आपण सहज कोणाच्या प्रेमात पडत असतो, पण हे प्रेम असते का आकर्षण ???
बर चला आपण मान्य केल की हे आकर्षण आहे तर पुढे प्रश्न असा आहे की आकर्षण म्हणजे काय ??? तर आकर्षणाची व्याख्या करायच झालं तर , एखाद्या व्यतीची वस्तूंची एखादी चांगली गोष्ट आवडणे. उदा. 1)एखाद्या मुलाची मुलीची शरीररचना आपल्याला.2) एखाद्या मुलीचे केस रंग पाहून वाटणारी भावना म्हणजे आकर्षण. 3) एखाद्यामुलाची बोलण्याची, लिहिण्याचे स्टाइल . म्हणजे आपल्याला एक ठराविक गोष्ट आवडणे.
पण आकर्षण वाटणे ही भावना चांगली आहे. पण प्रॉब्लेम तिथे नसून पुढे आहे या भावनेचे पुढे एकतर्फी प्रेम  निर्माण होते. व हेखेखोर पणा वाढतो, समोरच्या व्यक्तींनी आपले प्रेम मान्य नाही केल तरतिचा दुवेष निर्माण होतो
(सर्व गोष्टीला अपवाद असतो आणि इथे ही अपवाद असू शकतात) त्यातून सामाजिक विकृती निर्माण होत आसते. मुळातच प्रेम ही नैसर्गिक भावना आहे, आणि प्रेम करणे म्हणजे सजीव असल्याचे समजले जाते. मग ते प्रेम स्वतावर करणे असू किवा इतरावर करणे असू ( जर कोणता व्यक्ति स्वातावरही प्रेम करत नसेल तर त्याला डॉक्टर ची  गरज आहे.)
जर दोन परस्पर लिंगी व्यक्ति प्रेम करत असतील तर ती नैसर्गिक भावना आहे आणि ती आपण नक्कीच मान्य करू नाही का ?? जर एखादे नाते विश्वासावर आधारले असेल तर ते कधीही न सपणारे प्रेम आहे असे म्हणू. मग प्रेम म्हणजे काय तर  प्रेम म्हणजे फक्त सोबत असणे किवा शारीरिक भूक भागवणे नसते हा तो प्रेमाचा एक पदर असू शकतो. जर उदाहरण द्यायचे झाले तर दोन प्रेम करणारे व्यक्ति या लॉकडाऊन मुळे एक दुसर्‍या पासून लांब आहेत , कितेक महीने भेटले नाहीत तर त्यांचे प्रेम संपते का ??? याचं उत्तर असेल नाही प्रेम कधीच संपत नाही. जर ते दुरूनहि काळजी घेत असतील व विश्वास असेल तर ते प्रेम कधीच संपत नाही.
दोघांनीही आपल्या भावना एक दुसर्‍याला सांगणे व त्या समजून घेऊन त्याचा आदर करणे याला  आपण यशस्वी प्रेम म्हणू. तिचा नकार ही अगदी शांत पणे व सायमणे स्वीकारणे याला आपण प्रेम म्हणू शकतो. त्याच्या तिच्या कामात मदत करणे  घर दोघांचे आहे दोघांनी सांभाळे याला आपण प्रेम म्हणू शकतो. एक उधारहण द्यायचे झाले तर ती कमावरून आल्यातर तिच्या नवर्‍याने तिला एक कप  चहा आणि पाणी दिल तर तिला जगातील सर्वात मोठा आनंद मिळेल. खुश ठेवण्यासाठी प्रेम वाढवण्यासाठी फक्त प्रेमाने काळजीने बोलणेही पुरे असते यातून नाते व जीवन फुलत असते.
आता पर्यंत आपण प्रेम म्हणजे काय हे पहिलं आणि ते तुम्हाला पटल अस समजून पुढे बोलतो.   जे बोलतोय ते पटत आहे ना ?????
 नाण्याला दोन बाजू असतात तसच प्रेमलाही दोन बाजू असतात एक सुखकर आणि दुसरी दुखकर आता आपण दुसरी बाजू म्हणजे दुखकर समस्या समजून घेऊ .

1) विशिष्ट गोष्टींची अपेक्षा : मी सुरवातीलाच म्हणलो की आपल्यावर चित्रपट सृष्टी चा प्रभाव असतो बरयच वेळेस त्याचे अनुकरण करत असतो. त्याचे पाहून आपण प्रेमात पडत असतो, नको त्या वयात नको त्या अपेक्षा करतो. तशी  कृती करत असतो  व आपल्या जोडीदारकडून तश्या कृतीची अपेक्षा करतो व त्यातून वाद निर्माण होत असतात.पुढे प्रेम ही भावना नको नको वाटू लागते

2) प्रेमाची तहान: आपल्या प्रियकराने प्रियेसिने आपल्यावर कायम प्रेम करावे.आपल्यासाठी कायम उपलब्द असावे अशी अपेक्षा असणे साहजिक आहे पण पुढे याची हेकेखोर भूमिकेत रूपांतर होते त्यातून दोघांचेही आर्थिक शारीरिक मानसिक नुकसान होत असते याची त्यांनाही कल्पना नसते
 
3)प्रेम मिळाले तरी: हा  मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे की जरी आपल्याला मिळाले तरी कायम अनुभवतो वाटत असते पण नात्यात येणारे चडउतार ? ते प्रेम टिकते का नाही याची भीती..? मग ते प्रेम टिकते का नाही यांची भीती ..? प्रेम हरवले का..? एकमेकांवर अविश्वास याने नात्याला खूप जास्त  प्रमाणात मर्यादा येत असतात कित्येकदा याच कारणाने ही नाती तुटतात .(तुम्हाला असा कधी अनुभव आला आहे का ??)

4)प्रेम आणि परावलंबित्व : स्वता मधल्या अहंकाराला मुरड घालून प्रेमाच्या अनुभूतीसाठी दुसऱ्यावर आपण अवलंबून राहू लागतो, कितीही केले ,दिल घेतले,मिळालं तरी ते आपुरच वाटू लागत त्याची अधिकाधिक वाढत जाते प्रेम मिळालं तरी नाही मिळालं तरी प्रेमाविषयीच आकर्षक आणि त्यातून निर्माण होणारा रसीखेच कायम सुरूच असतो कायम असमाधान असते 

अशा समस्यातून कित्यकदा प्रेम संपते व प्रेमाचे द्वेष मध्ये रूपांतर होते. तर मित्रांनो अस होऊ द्यायचे नसल्यास  दोघांनीही वेळ द्या भौतिक सुखाच्या गराड्यात न अडकता प्रेमाची स्वतंत्र व्याख्या करा ऑनलाइन जगातही नात्याचा ओलावा ऑनलाइन घेता येत नाही तिथे व्यक्तीचा स्पर्श आपुलकीचे बोलणेच अपेक्षित असते नाही तर आपला प्रवास एकेलकोंडे होण्याकडे सुरू आहे अस लक्षात घ्या त्यामुळे अस होऊ द्यायचे नसेल तर आपल्या प्रिय व्यक्तिला वेळ द्या आणि सोबतीने कुठे फिरा आणि नाती छान जगा. ( आणि तुम्ही जगत असाल हे माहित आहे मला )  
 शेवटी एक उदाहरण देतो व  थांबतो.
जस पाण्याला थंड केले त्याचा बर्फ होतो उष्णता दिली की वाफ होते ह्या तीनही पाण्याच्या स्तिथीमध्ये H2O हाच पाण्याचा रेणू राहतो. तसच  जोडीदार भेटण्यापूर्वी प्रेमाचा रंग फिकट  गुलाबी असेल  जोडीदार भेटल्यावर हे गुलाबीपन गडद होईल वास्तल्या त्याला गुलाबक्षी किरमिजी रंग देईल वार्धक्य त्याला सुरकुत्या येईल म्हणून काही  त्याच गुलाबीपन नष्ट होत नाही मग मित्रांनो शरीरावर प्रेम न करता त्यांच्या विचार ,स्वभाव,गुण,आवडीनिवडी, बौद्धिक क्षमता समजून उमजून प्रेम करावे. प्रेम ही नैसर्गिक भावना आणि आपण ते नक्की जगले पाहिजे. 
प्रेम करत रहा प्रेम मिळवत रहा.

      अजून कोणत्या विषयावर लिहिलं गरजेचं आहे नक्की सांगा मी लिहिण्याचा प्रयत्न करेल. 

             Rebel Words..!!             Adinath.j11243@gmail.com 

Comments

  1. Khup Khup Chan Bhau Khup changala message dilay

    ReplyDelete
  2. खूप छान लेख आहे . आजची आधुनिक युवापिढी प्रेमदिवानी झालेली पाहायला मिळते आहे ,पण प्रेम आणि आकर्षण यात फरक आहे . शरीरावर केलेले प्रेम आणि मनावर केलेले प्रेम यातही फरक आहे याची जाणीव तुम्ही या लेखातून करून दिली . असेच सुंदर लेख लिहीत राहा .

    ReplyDelete
  3. खूप छान लेख आहे . आजची आधुनिक युवापिढी प्रेमदिवानी झालेली पाहायला मिळते आहे ,पण प्रेम आणि आकर्षण यात फरक आहे . शरीरावर केलेले प्रेम आणि मनावर केलेले प्रेम यातही फरक आहे याची जाणीव तुम्ही या लेखातून करून दिली . असेच सुंदर लेख लिहीत राहा .

    ReplyDelete
  4. खूप सुंदर अन सोप्या शब्दात प्रेमाची संकल्पना स्पष्ट केली. अजूनही नात्याचे काही पैलू प्रेम या संकल्पनेत मांडता येतील.असंच लिहित रहा��

    ReplyDelete
  5. आत्ताची जनरेशन आकर्षण ला प्रेम समजते काही दिवस ते आवडते ही पण काही दिवसांनंर त्या भावना नष्ट होतात मग समोरच्याची एखादी गोष्ट नाही आवडली तर मग त्या नात्यात वाद निर्माण होतात आणि बरच काही मग ते नात टिकतं च नाही कारण तिथे प्रेम च नसतं. खूप छान उदाहरणं आहेत . आणि प्रेम व आकर्षण यातील फरक छान पणे मांडला आहे . ग्रेट आदी असच लिहीत जा पुढेही आवडेल आम्हाला वाचायला

    ReplyDelete
  6. आत्ताची जनरेशन आकर्षण ला प्रेम समजते काही दिवस ते आवडते ही पण काही दिवसांनंर त्या भावना नष्ट होतात मग समोरच्याची एखादी गोष्ट नाही आवडली तर मग त्या नात्यात वाद निर्माण होतात आणि बरच काही मग ते नात टिकतं च नाही कारण तिथे प्रेम च नसतं. खूप छान उदाहरणं आहेत . आणि प्रेम व आकर्षण यातील फरक छान पणे मांडला आहे . ग्रेट आदी असच लिहीत जा पुढेही आवडेल आम्हाला वाचायला

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

Move on....!✍️* 🙇