काही स्वप्न स्वप्नातच पाहायला भारी वाटतात...।

काही स्वप्न स्वप्नातच पाहायला भारी वाटतात...।



काही स्वप्न स्वप्नातच पाहायला भारी वाटतात कारण सत्य माहीत असून ही आपण मनाला फसवण्याचा खेळ खेळतोच की, सत्य माहीत असून ही तो खेळ खेळायला मज्जा येतेच की, कारण सत्य स्वीकारण्यापेक्षा ते एक गोड खोट्या कधी न सत्यात येणाऱ्या एका छोट्याश्या आशेवर जगण्याचा आनंद वाटतो. पण तोच एक गोड मनाचा फसवा खेळ संपूर्ण आयुष्य फसवून जातो.

प्रेमात असताना ते काही स्वप्न असतात जे सत्यामध्ये कधीच पूर्ण होऊ शकत नसतात. म्हणून प्रेमाची स्वप्न स्वप्नातच पाहायला भारी वाटतात. 

माहीत असत हे दोन हृदय कधीच एक होऊ शकणार नाहीत. पण तेच खोटी गोड स्वप्न स्वप्नातच येतातच की प्रेमात असताना माहिती नसत पुढे आयुष्यात काय घडणार आहे.  पण त्यासाठी कोणकोणासाठी थांबत नसत, नियती  पण बघा किती वाईट असते आपण खड्यात पडतोय हे माहीत असूनही वेळ मात्र कोणासाठी थांबत नसते. पण एक मात्र आहे, वेळ मात्र कोणासाठी थांबत नसली तरी ती सगळ्यांवर येतच असते. 

बर झालं प्रेमाची स्वप्न स्वप्नातच पहिली नाहीतरी ते स्वप्न स्वप्नातच पाहायला भारी वाटतात.

वैष्णवी यादव , सोलापूर.











Comments

  1. क्या बात है,अप्रतिम लिहीले,
    जेव्हा मनाच्या स्मशान भुमीत
    पाहीलेले स्वप्न जळतात,
    तेव्हा भावनांचाधुर होतो,
    आणि जेव्हा भावनांचा धुर होतो,
    तेव्हा डोळ्यातून जे पाणी येते,
    त्याला आपण अश्रु म्हणतो..

    तेजस,

    ReplyDelete
  2. खूपच भारी.... खूप कमी शब्दात महत्वाचा आशय मांडला.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

Move on....!✍️* 🙇

प्रेमाचा पदर उलगडताना...!!