long distance relationship

प्रेम हे कधीच अंतर पाहत नाही कारण ते मनातून करायचं असत . त्यामुळे  एकमेकांपासून अंतराने दूर असलेल्या व्यक्तीदेखील मनाने एक होतात. यालाच आपण Long distance relationship असं म्हणतो. 
असं नात टिकवण्यासाठी दोघांनाही फार मेहनत घावी लागते . एकमेकांना आनंद मिळेल अस वागावं लागत .
प्रेम आहे म्हणून ते नेहमी बोलून का दाखवायचं अस विचार करायला नको खर तर या नात्यात नेहमी बोलून दाखवाव लागत म्हणजे एकमेकांविषयी आपुलकी अजुन वाढेल .

सोबत नसलो तरीही दिवस भर आपण काय केलं हे एकमेकांना सांगायला हवं . प्रत्येक वेळी एकमेकांच्या भावनांचा आणि निर्णयाचा आदर करावा . 
आपण नात्यात प्रामाणिक असावे .तुम्ही एकमेकांना जाणून घेताना तुमच्याबाबतीतली प्रत्येक गोष्ट तुमच्या जोडीदाराला सांगायला हवी. तुमचा प्रामाणिकपणा तुमच्या नात्यामध्ये बळकटी आणण्यास फार  मदत करत असतो.
एकमेकांना पासून दूर आहे म्हणून आपण नात्याला नियमित वेळ देणं गरजेचं असत . कितीही कामात असलं तरीही रोज थोडा वेळ बोलायचं .प्रेमात भविष्याविषयी बोलायला अनेकांना आवडते. प्रेम, लग्न, संसार, मुलं, नातेवाईक आणि आनंद या गोष्टी अनेकांना आवडत असतात. आपल्या आवडत्या जोडीदारासोबत आयुष्यातील स्वप्न रंगवण्याचा हक्क प्रत्येकाला असतो. त्यामुळेच तुम्ही तुमच्या प्रेमाच्या आयुष्याचे उद्दिष्ट ठरवा. तुमच्या नात्यात बळकटी आलेली तुम्हाला नक्कीच जाणवेल. 
अधून मधून एकमेकांच्या वाईट आणि चांगल्या गोष्टींबद्दल बोला . आपल्या मनातल्या विचार सांगा . 
चांगल्या नाही तर प्रत्येक वाईट काळातही तुम्हाला तुमच्या जोडीदाराची साथ अपेक्षित असते. जर तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या वाईट काळात त्याची साथ देऊ शकत असाल तर नक्कीच त्याला तुमचा आधार वाटू शकतो. आयुष्यातील प्रत्येक गोष्टी तो तुम्हाला त्यामुळे हक्काने सांगू शकतो.  

एकमेकांना आपल्या कुटुंबाची ओळख करून द्या म्हणजे नात्यात आणखी विश्वास वाढेल . कधी तरी एकमेकांसाठी खरेदी करा म्हणजे आवडी निवडी समजायला मदत होईल . काही महत्त्वाचे दिवस सोबत साजरे करावे म्हणजे प्रेम आणखी वाढेल हल्ली टेक्नॉलॉजी इतकी पुढे गेली आहे की, तुम्ही कितीही लांब असलात तरी देखील तुम्हाला एकमेकांचा चेहरा पाहता येऊ शकतो. तो केवळ एका व्हिडिओ कॉलमुळे. दिवसातून तुम्हाला जितके शक्य असेल तितक्या वेळा एकमेकांना व्हिडिओ कॉल करा.समोरील व्यक्तीच्या व्हिडिओ कॉलची वाट पाहण्यापेक्षा तुम्ही व्हिडिओ कॉल करा.
अश्या काही छोट्या गोष्टी केल्यास   long distance relationship नातं आणखी फुलेल आणि ते यशस्वी ही होईल .😊😊


...............
English translate...

Love never fails because it has to be done from the heart. Therefore, even people who are far apart from each other become one in mind. This is what we call a long distance relationship. It takes a lot of hard work for both of them to survive. We had to treat each other with happiness. Since there is love, you don't have to think about why you should always talk about it.

Introduce your family to each other so that the relationship grows stronger. Shopping for each other at some point will help you understand your favorite choices. Celebrating some important days together will make love grow. Nowadays, technology has advanced so much that no matter how far you are, you can see each other's faces.

It's just a video call. Make video calls to each other as often as you can during the day. Make video calls instead of waiting for the person in front of you. Doing a few small things like this will make the long distance relationship flourish and it will be successful.😊😊
                                                     
                                                            Written by  
                                                      Rebel Words..!! 
                                                     Sakshi Gawai...!!
                                          Adinath.j11243@gmail.com 

















Comments

  1. True...
    Long distance relationship never needs physical appearance they just need is the chances to fight, quarrel, care, love . The best feeling of life where some never face each other but love each other by soul...

    ReplyDelete
  2. खूप खूप आवडलं. खरंच अशीच गरज आहे जर नातं कायम स्वरुपी टिकवायचं असेल तर... खूप मस्त लिहिलंय..

    ReplyDelete
  3. Khup Chan lihlay.... ass kelyas kharach long distance relationship success hoil😇

    ReplyDelete
  4. Agdich apratimch.......... Mesmerising ❤❤❤
    Lots of love to both you keep writing
    Wush to read more from you.
    Eagerly waiting for new topic.

    ReplyDelete
  5. खुपच अप्रतिम शब्दरचना केली आहे, नात्यातील अंतर कमी करून मनाने एक होण्यास यातुन मदत होईलच,प्रत्येकाला वाटत सुरवात मी का करू...?
    त्याचा/तीचा आधी masg call आला पाहिजे यातुनच दुरावे वाढत जातात,
    त्यापेक्षा स्वतः सुरूवात करा आणि मनमोकळे पणाने एकमेकांशी गप्पा मारा तरच नातं सुंदर होईल....💕

    ReplyDelete
  6. खुपच अप्रतिम शब्दरचना केली आहे, नात्यातील अंतर कमी करून मनाने एक होण्यास यातुन मदत होईलच,प्रत्येकाला वाटत सुरवात मी का करू...?
    त्याचा/तीचा आधी masg call आला पाहिजे यातुनच दुरावे वाढत जातात,
    त्यापेक्षा स्वतः सुरूवात करा आणि मनमोकळे पणाने एकमेकांशी गप्पा मारा तरच नातं सुंदर होईल....💕

    ReplyDelete
  7. छान नाते असेच पाहिजे

    ReplyDelete
  8. छान लिहलंय.👌👌

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

Move on....!✍️* 🙇

प्रेमाचा पदर उलगडताना...!!