काहीतरी लिहायचं म्हणून....
![]() |
समतेच्या वाटेवरची. . .💖
तुझी- माझी कहाणी |
काहीतरी लिहायचं म्हणून सुरुवात केली. अनेक विषय डोक्यात आले. झोप काही येत नव्हती मग विचार केला, आपल्याबद्दल लिहावं आपल्या नात्याचं लिहावं. असं ही तू नेहमी म्हणत असते की ,बोलत नाही आपल्यावर लिहीत नाही तर आज लिहितो .आपल्या पहिल्या भेटीबद्दल हो हो दोन्ही भेटी काल्पनिक आणि वास्तविक!
आपण भेटलो या आभासी जगात सहवासी, साथीदार म्हणून विचारांच्या बळावर !आपल्या मैत्रीचं प्रेम ही झालं आणि तेव्हाच रचले आपण सोबतीचा आयुष्याचे अनेक मनोरे! तू माझ्या घरी यायचं तेव्हा तुझं नाव बदलायचं .माझ्या असणार्या मैत्रिणींमधील स्पेस मध्ये तू येणार नाही वगैरे वगैरे !
खरंच छान होते ना ते दिवस! रोज सकाळी कॉल मेसेज सगळं कास छान आलबेल !
आपल्या भेटीही आपण स्वप्नेही पाहायला सुरवात केली आणि आणि काय काय ते नियोजन होते पहिल्या भेटीत आपण कुठे फिरायचं , काय करायचं, खूप गप्पा मारायच्या असं सगळं काही पाहायला ऐकायला आणि जगायला तेव्हा छान वाटायचं.
आपण नेहमी म्हणायचो भेटूयात, बोलूयात आणि भविष्याचे ठरवूयात. तोपर्यंत प्रेम हे मर्यादित ठेवूयात आणि एक दुसऱ्यात गुंतायचं नाही; आणि करत बसायचो फक्त त्या प्रेमाची चिकित्सा आणि त्याच्या व्याख्यांची चेष्टा! आपलं प्रेम असं नाही करायचं म्हणत संविधानिक मूल्य ,नैतिक मूल्य ,सामाजिक मूल्य अशा साऱ्या गोष्टीवर चर्चा करता- करता आपण तेही जगत होतो एकमेकांना स्पेस देत !
कधीच अपेक्षा आणि अपेक्षांचे ओझं नाही वागवलं आपण. " तुम तुम्हारी जिंदगी जिओ "म्हणत तेव्हा आपल्याला फरक नव्हता पडत .कोण काय विचार करेल आपण करतो ते योग्य आहे का, अयोग्य! यांचा तेव्हा आपलं ध्येय एकच होतं ना एकमेकांना समजून घेणे आणि उमजून साथ देणे.
दोघांचाही घडण्याचा काळ अगदी आदर्श दाम्पत्यासारखा. आपल्यामध्ये होते अंतर फक्त रस्त्याचे ,मनाने आपण केव्हाच एक झालो होतो. न पटणारा मुद्दा वेगळ्या पद्धतीने मांडून! सगळं इतक छान आहे तर भेटून आयुष्याचा निर्णय घ्यावा म्हणून भेटीचं नियोजन केलं आणि ठरलं सगळं जगायचं आणि दुरवलेलं नातं आता जवळून पाहायचं .
दिवस कसे गेले कळेना आणि लवकरात भेट व्हावी म्हणून नियोजन सुरु झाले आणि भेटीचा दिवस आला. आपली पाहिली भेट ग्रेट करण्याच्या प्रयत्नात आपण असंच आपला खरेपणा जपत आपण सामोरे आलो तेव्हा खूप सारी आपल्यातील सुविधांनी मूल्य दाखवली एकमेकांना! पण नंतर तुझ्यातील असणारी बायको (स्त्रीत्व ) आणि माझ्या मधील नवरा (पुरुषत्व ) अचानक उफाळून आले. अगदी ठरलेल्या नियोजनाप्रमाणे तू तुझ्यातील बाई पण दाखवण्यासाठी मान सन्मान ठेवण्याचे माझा आदर आणि विचार करणे दाखवलं आणि मी पण माझ्यातील पुरुषत्व दाखवलं तुझ्यावर अधिकार गाजवत ! समतेच्या विचारकांच्या आणि तत्वज्ञानाचे वाभाडे काढत
आणि नात्याची नव्याने सुरूवात झाली.टिपिकल जगणं जगत काहीतरी लिहावं म्हणून…………….
लेखक : आदिनाथ जावीर.

Apratim didi
ReplyDeleteLayyyy maholl ahe 👌👌✌️
ReplyDeleteवास्तविक 👍
ReplyDelete