प्रयत्नांती परमेश्वर !
यु तो साँस भी आज जहरीली है
फिर भी जीने की चाहत- सी है
यु तो जिंदगी इम्तहान ले रही है
फिर भी दिल में राहत- सी है!
नेहमीप्रमाणे 'Whatsapp'उघडलं आणि कंटाळा जावा म्हणून मेसेज बघत बसले व्हॉट्सऍप आजकाल जीव की प्राण झालाय जणू !असाच एक मेसेज वाचला आणि अस्वस्थ झाले. त्या मेसेज मागे सुरुवातीला विशेष असं काहीच वाटलं नाही कारण लॉकडाऊनमुळे कोरोनासंदर्भात बातम्या कोणत्या ना कोणत्या तरी ग्रुपमध्ये पडत असतात. बऱ्याच लोकांच्या स्टेटसला ते मेसेज वाचून दुर्लक्ष करावे वाटते.दिवसभर कोणाचे ना कोणाचे मेसेज चालूच असतात. आजकाल कोरोनाच्या बातम्या जरी कानावर पडल्या तरी ते ऐकायला नको वाटते. बऱ्याच नकारात्मक ,चेष्टा-मस्करीच्या बातम्या आपण सर्वजण ऐकतो .एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून देतो.
तो message इंजेक्शनच्या मागणीचा होता. 'Torcilizumab' हे इंजेक्शनचे नाव !वर्गमैत्रिणीने मेसेज केला आणि ते इंजेक्शन कुठेच उपलब्ध होत नसल्याचे सांगितले. असे मेसेज तर रोज येतात मी ते रोज फॉरवर्ड करत असते पण त्या मेसेज मुळे पुढे जाऊन प्रत्यक्ष मदत पोहोचली की नाही हे पाहणे रोजच्या गोंधळात राहून जाते.चार दिवसांमागे हा मेसेज आला त्यावेळी मेसेज फॉरवर्ड करून काही होईल की नाही यासाठी प्रयत्न केला .पण 'नाही' असेच उत्तर ग्रुप मधून आले.एक काव्य क्षेत्रातील मित्र आहे तो सध्या कोरोना योद्ध्यासारखे काम करतो असे आणखी काही ठराविक व्यक्ती आहेत जे स्वयंस्फूर्तीने मदतीचे काम करताहेत. माझ्या ओळखीतल्या व्यक्तींना मी सांगून बघितले काही मदत करणार्या लोकांचे संपर्क मिळवले. अशा प्रकारे सुमारे दोन तास फोन द्वारे संपर्क मिळवून प्रयत्न करू लागले .जोपर्यंत कुठून 'हो' असे ऐकू येत नाही तोपर्यंत प्रयत्न करायचा असे ठरवले. मदतीची इच्छा असेल तर काहीच अशक्य नसते. सुरुवात करणे महत्त्वाचे असते धकाधकीच्या या काळात एकमेकांना सहानुभूतीने बोलणे तर गरजेचे आहेच सोबत मदतीचा एक हात देऊ करणे हेही तितकेच महत्त्वाचे! प्रत्येकाला कामे आहेत मात्र कामाच्या पसाऱ्यायातून सुद्धा आपण मदत करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे वाटते .आपल्या एकट्याच्या करण्याने काय होईल असे म्हणून त्याकडे दुर्लक्ष करण्यापेक्षा कोणाच्यातरी कामी आले तर काय वाईट ?
मित्रहो तुम्ही सर्वांनी ती कथा ऐकली असेलच !एक चिमणी म्हणते, "जंगल आगीने व्यापले आहे त्याची दाहकता कमी होऊ शकत नाही , संपूर्ण जंगल मी विझवू शकत नाही मात्र जे काही शक्य होईल ते करायचा माझ्या छोट्या चोचीने प्रयत्न करेन." सध्या अशाच प्रकारच्या समस्येने आपल्याला विळखा घातला आहे. प्रत्येकजण सोशल मीडियाचा वापर सर्रास करतो मात्र अशा प्रकारचे मेसेज दुर्लक्ष करण्याकडे अधिक लोकांचा जमाव दिसतो. प्रत्येकाच्या संपर्कात थोडेफार लोक असतात; जे समाजहिताचे काम करतात अशा लोकांशी आपण आपला थोडा वेळ देऊन बोलू शकतो ना? जीव वाचवण्यात जे समाधान आहे ते अन्य कशातच नाही.
इंजेक्शन मिळवताना मला बऱ्याच गोष्टी माहित झाल्या. मदतदात्यांचे संपर्क मिळाले .घरी बसून आपण कोणासाठी काहीतरी करू शकतो याची जाणीव झाली. संकटसमयी शहामृर्गाप्रमाणे वाळवंटात डोळे खुपसून बसण्यापेक्षा त्यांचा सामना करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. प्रत्येकाची मदत करण्याची पद्धत वेगळी असते .काही संकल्पना असतात .या लेखा निमित्त आपण संकल्पना सांगूया, समजून घेऊया. याशिवाय आधी स्वतः मजबूत बनून कोरोनारुपी संकटाशी झुंज देण्यास सज्ज होऊया!
आशा करते तुम्ही याचा नक्कीच विचार कराल !अशा प्रकारच्या बऱ्याच गोष्टी दैनंदिन जीवनात घडत असतात. हे लिहिणे कुठेतरी गरजेचे वाटले. तुम्ही सर्वजण मदत करत असालच हे मला माहित आहे. जर करत नसाल तर कुठेतरी छोट्या-छोट्या गोष्टींपासून त्याची सुरुवात करूया. फक्त नातेवाईक मित्र-मैत्रिणी यांच्या पुरतं जरी काही करता आलं तरी प्रयत्न करूया. यापलीकडे जाऊन इतर अनोळखी लोकांसाठी जरी तुम्ही प्रयत्न करत असाल तर अतिउत्तम गोष्ट आहे .
स्वस्त रहा ,सुरक्षित रहा!
तुमच्या प्रतिक्रिया मला आवर्जून कळवा!
- मयुरी प्रसाद खानविलकर सातारा


खरी गोष्ट आहे मदत ही केलीच पाहिजे आणि अश्या वेळेत मदत केली तर आपण जीवनात खरंच काही तरी करू शकलो याचे मनात एक वेगळेच सुख लाभल्यासारखे वाटेल आणि जीवन सार्थी ठरल्यासारखे वाटेल...उत्तम लेख 💯🙌🏻
ReplyDeleteदिदे खरंच आपल्या कडुन फक्त मेसेज फॉरवर्ड करुन काही फायदा नाही त्याचा फॉलोअप पण घेणे गरजेचे आहे मदत करतो केल्यानंतर जे समाधान मिळते ते खुप छान असते जिवनात आपण या सृष्टीवर काही तरी देणं लागतो ते या कार्यातुन पुर्ण होते म्हणून शक्य तेव्हढी मदत करत रहावे 🥰🥰
ReplyDeleteअभिमान आहे मला तुझ्यासारखी बहिण मिळाली 🥰🥰
वास्तव.. 👍
ReplyDelete😍👍 मस्त
ReplyDeleteस्वतःसाठी तर सगळेच जगतात , पण इतरांसाठी जगणारे खूप कमी लोक असतात 😊 बाकी खरंच छान अनुभव व्यक्त केला आहेस .👌👍 Keep up with the great work dear. ♥️
ReplyDeletegreat think Dear ❤️😍
ReplyDeleteमयुरी छान विचार करते आहेस. इतरांनीही तसा प्रयत्न करावा त्यासाठीचे तुझे प्रयत्नही वाखाणण्याजोगे आहेत. आज समाजात इतरांची दुःखे जाणून घेणारे फार कमी असतात. तर मदत करणारे किंवा त्यासाठी पुढे येणारे तर हाताच्या बोटावर मोजण्याइतपतही नसतात. ही शोकांतिका आहे. तुम्ही त्या शोकांतिकेला सकारात्मक पाहण्याचा चांगला प्रयत्न केला. हे वाचून छान वाटले. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!
ReplyDeleteNice mayuri
ReplyDeleteNice mayuri
ReplyDeleteGreat job by you mayuri keep it up
ReplyDeleteधन्यवाद सर्वांना... अशीच साथ असू द्या.😊
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
Deleteनेहमी काही तरी शिकवते.
Deleteमला लिखाण खुप काही शिकवून जाते तुझं.
माणसाने लिहावं पण त्या पासून काही तरी फायदा झाला पाहिजे.
आणि हो लिहत जा सतत.
मुद्देसूद मांडणी व आयुष्य जगण्याची प्रेरणा मिळते लेखातून असंच लिहत जा नेहमी.
अप्रतिम लिखाण असते.
खूप छान 🌹
ReplyDeleteNice mayuri
ReplyDeleteGood👍👍
ReplyDelete